काळजी घ्या… मुंबईत, जीबीएसचा पहिला रुग्ण; पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू

राज्यात सहा जणांचा बळी घेणाऱ्या ‘जीबीएस’ विषाणू बाधित पहिला रुग्ण मुंबईत आढळला आहे. या रुग्णावर पालिकेच्या अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जीबीएस म्हणजे गुलेन बॅरे सिंड्रोम आजार प्रामुख्याने मज्जातंतूवर परिणाम करतो. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून या आजाराने थैमान घातले आहे. या आजाराने मुंबईतही इंट्री केल्याने टेन्शन वाढले आहे. अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात राहणाऱया एका 63 वर्षीय महिलेला आता जीबीएसची लागण झाली आहे. मात्र पालिकेने संबधित रुग्ण जीबीएस संशयित असल्याचे सांगितले आहे.

जीबीएस होण्याची कारणे

बॅक्टेरियल, व्हायरल इन्फेक्शन, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे आणि दूषित पाणी पिणे यामुळे हा आजार होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता बाळगावी आणि कोणतीही लक्षणे दिसल्यास पालिका किंवा इतर दवाखान्यात डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

असा आहे जेबीएसचा धोका

  • जीबीएस म्हणजेच गुलेन बॅरी सिंड्रोमध्ये माणसाच्या मज्जातंतूवर विषाणू हल्ला करतो. त्यामुळे रुग्णाची रोगप्रतिकार शक्तीच कमी होते. शिवाय मेंदूकडून इतर अवयवांना मिळणारे संकेत कमी होतात.
  • यामध्ये स्नायूदेखील कमकुवत होतात. हातापायातील संवेदना कमी होऊ शकतात. गिळण्यास किंवा श्वास घेताना त्रास, हातापायांना मुंग्या येणे, दम लागणे अशी लक्षणे यामध्ये दिसतात.