भोपाळ येथे तयार करण्यात आलेली फायर फायटिंग बोट कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला रवाना झाली. ही देशातील पहिली फायर फायटिंग बोट आहे. महाकुंभमेळ्यादरम्यान प्रयागराज येथील घाटावर बोट तैनात असेल, जेणेकरून आगीसारख्या घटनेत तत्काळ बचावकार्य करता येईल. पहिली बोट प्रयागराजला रवाना झाली असून उर्वरित पाच बोटी येत्या 8- 10 दिवसांत प्रयागराजसाठी पाठवण्यात येतील. फायर फायटिंग बोटीमध्ये एकाच वेळी 10 क्रू मेंबर बसू शकतील. बोटीची मोटार डिझेलवर चालणारी आहे, पण पेट्रोलसाठी वेगळा टँक आहे.