पूँछ जिल्ह्यात गोळीबार

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद अधिवेशनादरम्यान राजकारण करण्यात मश्गुल असताना जम्मू-कश्मीरच्या पुँछ जिह्यात नियंत्रण रेषेजवळ आज गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री उशीरा कृष्णा घाटी सेक्टरमध्ये हिंदुस्थानी चौकीवर सीमेपलिकडून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला हिंदुस्थानी जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.

काही काळ गोळीबार सुरुच होता. परंतु, यात कुणीही जवान शहीद झाल्याचे किंवा स्थानिक जखमी झाल्याचे वृत्त नाही. गोळीबाराच्या घटनेनंतर या परिसरात सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली असून सीमेपलीकडून किंवा पाकिस्तानातून कुणी दहशतवादी हिंदुस्थानात घुसला आहे का? याची चाचपणी सुरक्षा जवानांकडून सुरु आहे.