मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळ गोळीबार, एकजण जखमी

सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळील डिमेलो परिसरात सोमवारी रात्री 10 च्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी अंगडीया नावाच्या व्यापाऱ्यावरती गोळीबार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

चोरीच्या उद्देशाने हा गोळीबार केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये अंगडीया व्यापाऱ्याच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले. त्यांच्यावरती सैफी रुग्णालयात उपचार सुरु आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. घटनेचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.