मुंबईत इमारतीत भीषण आग, एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; एक जण जखमी

मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील ऑबेरॉय कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी रात्री एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या आगीत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी येथील ऑबेरॉय कॉम्प्लेक्समधील स्काय पॅन बिल्डिंगमध्ये रात्री 10 च्या सुमारास ही आग लागली. रा त्री तेरा मजली निवासी इमारतीच्या 11 व्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि पालिका अधितारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आगीच्या धुराने श्वसनाचा त्रास झालेल्या दोघांना तत्काळ जवळच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी राहुल मिश्रा (75) या ज्येष्ठ नागरिकाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर रौनक मिश्रा (38) याच्यावर उफचार सुरु आहेत. आगीमध्ये फ्लॅटमधील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक सामान आणि घरातील सामान जळून राख झाले आहे. ही आग नेमकी कशी लागली याचे निश्चित कारण कळलेले नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.