खैरानी रोड येथील भंगाराच्या गोदामाला आग

मानखुर्द येथील भंगाराच्या गोदामाला लागलेल्या आगीची घटना ताजी असताना आज साकीनाकातील खैरानी मार्गावर सकाळच्या सुमारास भंगाराचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीत प्लॅस्टिक, फर्निचर, भंगार सामान जळून खाक झाले.

वाजीद अली कंपाऊंड येथील प्लॅस्टिक, कचरा, लाकडी फर्निचर आदींची एकमजली असलेल्या गोदामांनी सकाळी 5.50 वाजताच्या सुमारास अचानक पेट घेतला. काही क्षणातच आगीने इतर गोदामांना वेढले. गोदामात भंगार, ज्वलनशील सामान असल्याने आगीने भडका घेतला. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.