
चंद्रपूर शहरालगत असलेल्या MIDC परिसरातील लक्की पेट्रोलियम ऑईल कंपनीत भीषण आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत जिवीतहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करत आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे.
आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. लक्की पेट्रोलियम ऑईल कंपनीसह कंपनी शेजारी असलेल्या कंपन्यांचे ही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने जिवीतहानी झालेली नाही. आग लागल्यानंतर आग विझवण्यासाठी किंवा कोणतीही अग्निरोध यंत्रणा कंपनीकडे नसल्याने आग पसरत गेल्याचे सांगण्यात येत आहे.
चंद्रपुरात MIDC परिसरातील ऑईल कंपनीला आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल#chandrapur pic.twitter.com/38gS9Pvnrk
— Saamana Online (@SaamanaOnline) March 24, 2025