कोल्हापुरातील ‘कुष्ठधाम’च्या वास्तूला आग

शेंडा पार्क येथील कुष्ठरोग निर्मूलनासाठी संस्थानकालीन उभारण्यात आलेल्या ‘कुष्ठधाम’च्या जुन्या इमारतीस सोमवारी पहाटे भीषण आग लागली. ‘केशवराव भोसले नाट्यगृह’ आगीत भस्मसात झाल्याच्या प्रकरणानंतरची आणखी एका शाहूकालीन ऐतिहासिक वास्तूला लागलेल्या आगीमुळे चर्चा होऊ लागली आहे. गांजा ओढणाऱ्यांच्या टोळक्यामुळेच ही आग लागल्याचा प्राथमिक संशय असला, तरी जमीन लाटण्यासाठीच हे षड्यंत्र रचून कोणीतरी दुष्कृत्य केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.