धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये रुग्णालात आग, 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका रुग्णालयात आग लागून 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.


उत्तर प्रदेशच्या झाशी जिल्ह्यातील महाराणी लक्ष्मीबाई मेडिक कॉलेजमध्ये काल रात्री 10.45 च्या सुमारास ही आग लागली. रुग्णालयात ही आग लागल्यानंतर अनेक बालकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. पण या अपघातात 10 नजजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.


घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. युद्ध पातळीवर आग विझवण्यात आली. नवजात बालकांचा मृत्यू झाल्यांना मातांनी दुःखाचा हंबरडा फोडला.