मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

मानखुर्दमध्ये एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर ही आग विझवण्याचे काम करत आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळालेले नाही.