वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरात गुरुवारी सकाळी आग लागली. गाभाऱ्यातील खिडकीजवळ शॉर्टसर्किट झाले. सकाळची मंगल आरती झाल्यानंतर ही घटना घडली. स्पर्श दर्शन सुरू असताना अचानक खिडकीजवळ आगीचे लोट दिसले.
आगीच्या ज्वाळा मोठ्या होत्या. त्यामुळे मंदिरात उपस्थित भाविक आणि कर्मचारी घाबरले. मंदिर परिसरात तैनात पोलिसांनी तत्काळ भाविकांना मंदिराबाहेर नेले आणि अग्निशमन उपकरणांच्या मदतीने आग विझवली.
मंदिराचे एसडीएम शंभू शरणा यांनी सांगितले की, ही घटना सकाळी 4.55 वाजता घडली. आगीवर लगेच नियंत्रण मिळवण्यात आले. मंदिरात शॉर्ट सर्किट कसे झाले. याचा तपास केला जात आहे. मंदिरात प्रत्येक वायरिंगची तपासणी केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ दर्शन बंद करण्यात आले.