‘जोश’ फेम अभिनेता शरद कपूरवर एका महिलेने खळबळजनक आरोप केला आहे. फिल्मच्या बहाण्याने घरी बोलावून शरद कपूरने विनयभंग करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून शरद कपूरवर भारतीय न्याय संहिता कलम 74, 75 आणि 79 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, तिची आणि शरद कपूरची फेसबुकवर ओळख झाली होती. यानंतर दोघांमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे बोलणे सुरू झाले. यादरम्यान शरदने महिलेला चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने त्याच्या खार येथील घरी बोलावले. घरी गेल्यानंतर शरद तिला बेडरुममध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला. पीडिता कसातरी स्वतःचा बचाव करत त्याच्या तावडीतून पळाली.
पीडिता निघून गेल्यानंतर शरदने व्हॉट्सॲपवर अपशब्द वापरून तिला संदेश पाठवला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अभिनेता शरद कपूरची लवकरच चौकशी करणार आहेत.