भाजप नेत्याकडून महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल

भाजप नेते मोहनलाल बदोली यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदोल हे भाजप नेते असून हरयाणाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. बदोली यांनी आणि एका व्यक्तीने आपल्यार सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. त्यानंतर बदोली आणि आणखी एका व्यक्तीवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार मोहनलाल बदोली आणि जय भगवान उर्फ रॉकी या दोघांनी हिमाचल प्रदेशमध्ये या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या दोघांनी या महिलेचा व्हिडीओ शूट केला. इतकंच नाही तर याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.

महिलेने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून बदोली आणि जय भगवानविरोधात गुन्हा दाखल केला आहे.