उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडणाऱ्या ओंकार चव्हाणसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पोस्टर फाडल्याप्रकरणी ओंकार चव्हाण याच्यासह पाच जणांवर सोलापूर येथील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडण्यासह ओंकार चव्हाण याच्यासह पाच जणांवर सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी करणे व इतर नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी प्रवीण भोसले यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार ओंकार चव्हाण, विशाल पवार, अभिषेक चव्हाण, सोनू चव्हाण या चौघांसह इतर दोन तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.