भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसने प्रत्येक संस्था काबीज केली असून आता आम्ही भाजप, आरएसएसविरोधात लढत आहोत, असे विधान केल्याबद्दल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारावर आसामच्या गुवाहाटी येथील पान बाजार पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी हिंदुस्थानचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणणारी विधाने केल्याचा एफआयआरमध्ये आरोप आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे वकील मोनजीत चेतिया यांनी राहुल यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याने स्वीकारार्ह भाषणाची सीमा ओलांडली आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.