निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्याच्या घरात घुसून दागिन्यांसह नऊ लाखांची रोकड हिसकावल्याप्रकरणी पूर्व विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार प्रसाद सानप यांच्यासह चार जणांविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जत्रा हॉटेल परिसरात राहणारे योगेश पाटील यांच्याकडे प्रसाद सानप यांनी निवडणूक खर्च सादर करणे, महापालिकेच्या विविध परवानग्या मिळवण्याचे काम सोपवले होते. त्यासाठी दोन लाखांचा मोबदला दिला. मात्र, हे पैसे सानप यांनी महापालिका परवानगीसाठी वापरण्यास सांगितले. त्यावरून पाटील व सानप यांच्यात वाद झाला.