‘आपले सरकार’ सेवा देण्यास विलंब झाल्यास रोज एक हजाराचा दंड

‘आपले सरकार’ पोर्टलमार्फत जनतेच्या तक्रारी ऑनलाईन घेतल्या जातात तसेच त्या तक्रारींवर झालेल्या कार्यवाहीची माहितीही वेळेवर देणे बंधनकारक असते. मात्र संबंधित विभागांचे प्रमुख बहुतांश तक्रारींवर कार्यवाही करण्यात टाळाटाळच करतात किंवा ती तक्रार सराईतपणे दुसऱ्या विभागाकडे वळवतात. परिणामी जनतेला कार्यवाहीची माहिती मिळण्यास विलंब होतो. आता या पोर्टलच्या डागडुजीनंतर शासनाच्या अधिसूचित सेवा त्यावर द्याव्या लागणार आहेत. त्यात विलंब झाल्यास संबंधित विभागाच्या प्रशासकीय प्रमुखांना रोज एक हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे.