
शिक्षणात एज्युटेनमेंटची भूमिका बळकट व्हावी यासाठी किड्झानियाचे ग्लोबल सीओओ हर्नन बार्बिएरी हे भारताच्या दौऱयावर आले आहेत. या भारत दौऱयामध्ये त्यांनी किड्झानिया मुंबई व किड्झानिया दिल्ली एनसीआर या ठिकाणी भेट दिली. या वेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे भागधारक, भागीदार, कर्मचारी व कुटुंबांशी संवाद साधला. ते दोन्ही टिकाणच्या कर्मचाऱयांनाही भेटले. किड्झानिया 17 देशांमध्ये असून रिअल-वर्ल्ड म्हणजेच प्रत्यक्ष जगातील काwशल्यांचा रोल-प्ले अनुभव उपलब्ध करून दिला आहे.
एअरटेलने नेटवर्क वाढवले
आयपीएल सीझन सुरू होण्यापूर्वी एअरटेलने वानखेडे स्टेडियम परिसरातील आपले नेटवर्क वाढवले आहे. या सामन्यांना एक लाख क्रिकेट चाहते येण्याची अपेक्षा केली जात आहे. त्यामुळे एअरटेलने नेटवर्क वाढवले आहे. एअरटेलने स्टेडियमच्या आसपासच्या भागात आपल्या सध्याच्या सेल साइट्समधील 7 साइट्स वाढवल्या आहेत.
एनबीएफसी भागीदारी
एनबीएफसीने देशभरातील ग्राहकांच्या आकांक्षांना सक्षम बनवण्याच्या हेतूने बिगौस, फिन कूपर्स पॅपिटल आणि प्रॉसपॅरिटीसोबत एक धोरणात्मक भागीदारी केली. या वेळी मनबा फायनान्सचे कार्यकारी संचालक मोनिल शाह उपस्थित होते.
गोदरेजची मोहीम
जागतिक जल दिनानिमित्त गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने जल सुरक्षेसाठी आवश्यक हवामान स्थिती सुधारण्यासाठी आणि नैसर्गिक परिसंस्थांचे जतन करण्यासाठी आपली वचनबद्धता पुन्हा एकदा दाखवून दिली. या वेळी गोदरेजच्या तेजश्री जोशी उपस्थित होत्या.
एलजीचा अहवाल
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेडने आज निलसेनआक्यूच्या सहकार्याने एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला. ‘लाइफ इज गुड सर्व्हे’ शीर्षक असलेला हा अहवाल आहे. आठ प्रमुख भारतीय शहरांमधील 1,313 प्रतिसादकर्त्यांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे.
सीएफए इन्स्टिटय़ूट
सीएफए इन्स्टिटय़ूट ने ‘क्लिक्स अॅण्ड क्रेडिबिलिटी ः अंडरस्टँडींग फिनफ्लुएंसर्स रोल इन इनव्हेस्टमेंट डिसिजन्स’ हा बहुप्रतिक्षित इंडिया फिनफ्लुएंसर रिपोर्ट सादर केला. यावेळी सीएफए इन्स्टिटय़ूट इंडियाच्या कंट्री हेड आरती पोरवाल उपस्थित होत्या.
फ्लेक्सीलोन्सतर्फे 100 कोटींचे कर्ज वाटपाचे लक्ष्य
फ्लेक्सीलोन्सतर्फे 2025 मध्ये महिला-प्रणीत एमएसएमईंच्या वाढीला चालना देण्यासाठी 100 कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, अशी माहिती फ्लेक्सीलोन्सचे सहसंस्थापक रितेश जैन यांनी दिली. आर्थिक अडथळ्यांशिवाय महिला स्वतःचा व्यवसाय वाढवू शकतील हे सुनिश्चित करण्यासाठी किमान कागदपत्रांसह हमी-मुक्त व्यवसाय कर्ज सहज उपलब्ध करून देणे ही आमची बांधीलकी आहे, असेही ते म्हणाले. भारतात सध्या 8 मिलियनहून अधिक महिलांच्या मालकीच्या एमएसएमई आहेत.
वीची मुंबईत 5 जी सेवा
आघाडीची टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने मुंबईमध्ये आपल्या 5 जी सेवा सुरू केली. त्यामुळे व्होडाफोनच्या मुंबईतील ग्राहकांना अत्याधुनिक कनेक्टिविटीचा लाभ घेता येणार आहे. वीच्या 5 जी शुभारंभ ऑफरमध्ये वी सबस्क्रायबर्सना फक्त 299 रुपयांपासून पुढील किमतींना अनलिमिटेड 5 जी डेटा मिळत आहे.
ब्लू ड्रगनची भागीदारी
ब्लू ड्रगन ब्रँडने आता सनबीम वेंचर्ससोबत भागीदारी केली आहे. या वेळी ब्लू ड्रगनच्या बँकॉक हबचे जनरल मॅनेजर बवॉर्न पकडीसुसु उपस्थित होते. ब्लू ड्रगनची उत्पादने आता 50 हून अधिक शहरांमध्ये आणि 1500 हून अधिक प्रीमियम आऊटलेट्समध्ये उपलब्ध आहेत. ग्राहकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी ब्लू ड्रगन आपले जाहिरात उपक्रम वाढवत आहे आणि झटपट डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर अधिक प्रमोशन करत आहे. सनबीम वेंचर्स ही एक उत्पादनांची वितरण, विपणन कंपनी आहे.
पारसचा करार
अँटिड्रोन लेझर डोम विकसित करण्यासाठी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नोलॉजीजने डीआरडीओसोबत 142.31 कोटींचा करार केला आहे. या वेळी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नोलॉजीजचे एमडी मुंजाल शरद शाह उपस्थित होते. या करारांतर्गत देशातील सर्वात अत्याधुनिक अँटिड्रोन लेझर डोम विकसित करण्यात येणार आहे. या लेझर प्रणालीच्या विकासाचे काम 24 महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. या प्रकल्पांतर्गत लेझर सोर्स मॉडय़ूल विकसित करण्यात येणार आहे.
ओ. पी. जिंदाल अव्वल
ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी (जेजीयू)ने उच्च शिक्षणात ग्लोबल लिडर म्हणून आपले स्थान बळकट करत प्रतिष्ठत क्यूएस सब्जेक्ट रँकिंग्ज 2025 मध्ये ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. तसेच युनिव्हर्सिटीने पाच नवीन शाखांमध्ये अव्वल स्थानदेखील मिळवले आहे, असे जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी (जेजीयू) चे चान्सलर नवीन जिंदाल आणि जेजीयूचे व्हाईस चान्सलर डॉ. सी. राज कुमार यांनी सांगितले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.