आयटीआयच्या अंतिम गुणवत्ता यादीत 1 लाख 96 हजार 48 विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. राज्यात दिड लाखहून अधिक जागा असलेल्या शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत ऑगस्ट 2024 मधील सत्रासाठी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांची प्रवेशाची यादी 14 जुलै रोजी जाहीर होणार आहे.
आयटीआय प्रवेशाच्या चार फेया होणार आहे. या काळात अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन फेरीत सहभागी होण्यासाठी 17 जुलैपासून संधी मिळणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने राज्यभरात असलेल्या आयटीआय अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर केली. यानंतर हरकती आणि सूचना आल्यानंतर रविवारी अंतिम यादी जाहीर करण्यात आली. 1 लाख 96 हजार 48 विद्यार्थ्यांची ही यादी असून यामध्ये 30 हजार 333 मुली तर 1 लाख 70 हजार 632 मुले आहेत. या विद्यार्थ्यांचे प्रवेश शासकीय तसेच खासगी आयटीआयमधील मागणी असलेल्या ट्रेडला 1 लाख 50 हजार 332 जागांवर होणार आहेत. यामुळे जागा कमी आणि विद्यार्थी जास्त असल्याने प्रवेश मिळवण्यासाठी मोठी चुरस होणार आहे.
आयटीआयसाठी गेल्या वर्षीच्या तुलेनत यंदा अर्ज कमी आले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत अर्जाची 17 हजारांनी अर्ज कमी आले आहेत. गेल्यावर्षी 2 लाख 18 हजार अर्ज अंतिम झाले होते.