अनुराग कश्यपचा बॉलीवूडला अलविदा

प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि अभिनेता अनुराग कश्यप सध्या जोरदार चर्चेत आहे. चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्यासाठी अनुरागने मुंबई आणि बॉलीवूडला अलविदा केले आहे. बॉलीवूडमधील प्रत्येकाला आपल्या चित्रपटातून 500 ते 800 कोटी रुपयांची कमाई हवी आहे. याआधी बॉलीवूडमध्ये क्रिएटिव्हिटी पाहायला मिळत होती, परंतु आता ती क्रिएटिव्हिटी पाहायला मिळत नाही, अशी खंत अनुराग कश्यपने व्यक्त केलीय. माझ्याआधीही अनेकांनी बॉलीवूडला सोडले असून ते दुबईत स्थायिक झाले आहेत, असे अनुरागने म्हटले.