इन्कम टॅक्स रिटर्नसाठी उरले फक्त 8 दिवस

इन्कम टॅक्स रिटर्न फाइलिंगची डेडलाईन संपायला आता केवळ 8 दिवस उरले आहेत. जर 31 जुलै 2024 पर्यंत आयटीआर फाईल केली नाही तर करदात्याला दंड म्हणून मोठी रक्कम चुकवावी लागणार आहे. देशभरात आतापर्यंत 12 कोटींहून जास्त करदात्यांनी आयकर विभागाच्या पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी केली आहे. तर आतापर्यंत 3 कोटी 10 लाख टॅक्स रिटर्न फाईल करण्यात आल्या आहेत. 31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे निशुल्क आहे. परंतु त्यानंतर करदात्यांना दंड भरावा लागणार आहे. टेक्सपेयर्सचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असल्यास त्याला 5 हजार
रुपये दंड द्यावा लागणार आहे.