इंटेलच्या 15 हजार कर्मचाऱ्यांना नारळ

चिप बनवणारी दिग्गज कंपनी इंटेलच्या तब्बल 15 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळू शकते. कारण, लवकर त्यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे. कंपनीच्या पुनर्रचनेसाठी कंपनी मोठे पाऊल उचलणार असल्याचे कंपनीने घोषित केले आहे. दरम्यान, कुठल्या देशात किती जणांच्या नोकऱ्या जाणार याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

नोकरी कपातीप्रकरणी इंटेलचे सीईओ पेट गेलसिंगर यांनी कर्मचाऱ्यांना एक मेमो पाठवला आहे. आपल्यासाठी येणारे दिवस परीक्षा घेणारे असणार आहेत. पुढे परिस्थिती आणखी गंभीर होत जाईल. त्यामुळे कंपनीच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी नवी सुरुवात करण्याच्या दृष्टीने काही बदल करणे आवश्यक असल्याचे गेलसिंगर यांनी म्हटले आहे. 2025 मध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून 10 अब्ज डॉलरची बचत करण्याचे ध्येय आहे.