
छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये 45 लाख रुपयांचे बक्षीस असलेली महिला नक्षलवादी रेणुका ऊर्फ बानू आज चकमकीत ठार झाली. दंतेवाडा आणि विजापूर जिह्याच्या सीमेवर असलेल्या जंगलात सकाळी 9 वाजताच्या सुमारास गोळीबार झाला. मृत रेणुका कायद्याची पदवीधर होती आणि 1996 पासून नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रिय होती.