शेअर बाजारात महिला गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरपर्यंत देशात एकूण 10.55 कोटी वैयक्तिक गुंतवणूकदार होते. यामध्ये महिलांचा वाटा 2.52 कोटी इतका आहे. महाराष्ट्र, गुजरात, तामीळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये एकूण इक्विटी गुंतवणूकदारांमध्ये महिलांचा वाटा 27 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. गोव्यातील गुंतवणूकदारांमध्ये महिलांचा वाटा सर्वाधिक 32 टक्क्यांवर पोहोचला आहे.