
पिझ्झा म्हणजे लहान-थोरांपासून सर्वांचाच आवडता पदार्थ. पण याच पिझ्झामुळे एका महिला शेफला आपला जीव गमवण्याची वेळ आली आहे. पिझ्झाचा तुकडा तोंडात घेताच पोलंडमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पॉलिना वानाट असे मयत महिला शेफचे नाव आहे.
पॉलिनाने पिझ्झाचा तुकडा टाकताच तिला उलटी आली. उलटी झाल्यानंतर ती पुन्हा डायनिंग एरियात आली आणि बेशुद्ध झाली. यानंतर तिच्या सहकाऱ्यांनी तात्काळ आपत्कालीन सेवेला फोन केला. तसेच पॉलिनाला सीपीआर देत शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र हॉस्पिटलमध्ये नेताच डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केले.
पॉलिनाच्या गळ्यात पिझ्झाचा तुकडा अडकल्याने तिचा मृत्यू झाला. सहा महिन्यांपूर्वीच पॉलिना पिझ्झेरियामध्ये कामाला लागली होती. तिच्या पश्ताच दोन मुलं आहेत.