
आमचे केमिकल विकून अधिकचा नफा कमवा या सायबर भामटय़ांच्या बतावणीला बळी पडून माटुंगा येथील एका महिला केमिकल व्यावसायिकेने तीन लाख रुपये देऊन आपली फसवणूक करून घेतली, पण माटुंगा पोलिसांनी अशा प्रकारे ई-मेल स्पुफिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या नायजेरियन सायबर गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या. सुमती (नाव बदलेले) यांना काही दिवसांपूर्वी एक मेल आला. आमचे केमिकल यूके देशात विकून अधिकचा नफा कमवा. तो कसा कमवायचा याबाबत त्या मेलमध्ये माहिती देण्यात आली. सुमती यांनी त्या प्रस्तावाला सहमती दर्शवली. मग यूकेतील कंपनीने हिंदुस्थानातील अरुणाचल प्रदेशातील राम ट्रेडर्स या कंपनीकडून एक लिटर सॅम्पल केमिकल सुमती यांनी घेऊन त्यांना द्यायचे ठरले. मग सुमती यांनी आरोपींनी दिलेल्या बँक खात्यावर तीन लाख रुपये पाठवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.