मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामे हटवण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय विभागाने दिल्यानंतर शनिवारी काही नागरीकांनी आपली अनधिकृत बांधकामे स्वतःहून हटवली आहेत. एकूण 319 अनधिकृत बांधकामांना प्रशासनाने नोटीस बजावली होती. अद्यापही जी बांधकामे हटवली नाहीत, त्यांच्यावर सोमवारी कारवाई होणार आहे.
मिरकरवाडा बंदरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे बांधण्यात आली होती. अशा 319 बांधकामांना काही दिवसांपुर्वीच मत्स्यविभागाने नोटीस बजावली होती. गुरुवार (दि.23 जानेवारी) ही अनधिकृत बांधकामे स्वतःहून हटवण्याची अंतिम मुदत होती. त्याचदिवशी सायंकाळी मिरकरवाड्यातील ग्रामस्थ मत्स्य व्यवसाय विभागाच्या कार्यालयावर धडकले. त्यावेळी अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी काही नागरीकांनी आपली बांधकामे हटवली.