ट्रम्प यांना संशय पिशाच्च्याने ग्रासले! सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची करणार लाय डिटेक्टर चाचणी

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सत्ता हाती घेतल्यानंतर अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्मय घेतले आहेत. तसेत सरकारी खर्च कमी करण्याची जबाबादारी एलॉन मस्क यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सरकारी खर्च कमी करण्यासाठी आतापर्यंत सुमारे 85 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. मात्र, एवढ्यावरच ट्रम्प यांचे समाधान झालेले नाही. सरकारी कर्मचाऱ्यांकडून गोपनीय कागदपत्रे लिक होऊ शकतात, अशी भीती ट्रम्प यांना वाटत आहे. या संशयाने ट्रम्प ग्रासले आहेत. त्यासाठी अमेरिकेतील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची लाय डिटेक्टर चाचणी करण्यात येणार आहे.

सरकारी खर्च कमी करण्यासाठी सुमारे 85 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. तर उर्वरित कर्मचाऱ्यांची लाय डिटेक्टर चाचणी करण्याची तयारी डोनाल्ड ट्रम्प प्रशासन करत आहेत. यामुळे सरकारी कर्मचारी नाराज असून या निर्णयामुळे खळबळ निर्माण झाली आहे. गोपनीय कागदपत्रे लीक होऊ नयेत, यासाठी खबरदारी म्हणून कर्मचाऱ्यांची ही चाचणी करण्यात येणार आहे.

सरकारच्या गोपनिय फाईल्स लीक होऊ नयेत किंवा काही माहिती लीक झाली असेल तर त्याची माहिती मळावी, यासाठी ट्रम्प प्रशासन लाखो सरकारी कर्मचाऱ्यांची लाय डिटेक्टर चाचणी करणार आहे. अमेरिकेच्या गृह मंत्रालयाकडून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. सरकारी गोपनिय कागदपत्रांच्या सुरक्षेसाठी आणि गोपनीय माहितीच्या रक्षणासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत ही चाचणी द्यावी लागणार आहे, असे गृहमंत्री क्रिस्टी नोएम यांनी स्पष्ट केले. गृह सुरक्षा विभाग ही राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एक संस्था आहे. आपण सर्व कर्मचाऱ्यांची पॉलीग्राफ चाचणी करू शकतो, केल्या पाहिजेत आणि भविष्यातही करू. देशाच्या आणि गोपनीय कागदपत्रांच्या सुरक्षेसाठी हे गरजेचे आहे, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

या निर्णयाविरोधात अनेक कर्मचारी नाराज आहेत. तर अनेकजण राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.आपण प्रामाणिकपणे काम केले आहे. मात्र, चाचणीतील काही त्रुटींमुळे दोषी आढळले तर अनेक समस्या येऊ शकते. यामुळे अनेक सरकारी कर्मचारी भितीच्या छायेखाली आहेत. मात्र, आता ट्रम्प यांना संशय असल्याने ते आता कोणालाही जुमानायला तयार नाहीत. अमेरिकेसाठी कटू निर्णय घ्यावे लागले तरी चालतील. मात्र, सुरक्षेसाठी ही चाचणी करणारच, यावर प्रशासन ठाम आहे.