काश पटेल एटीएएफचेही प्रमुख; घेतली शपथ

एफबीआयचे नवनिर्वाचित संचालक काश पटेल यांनी आज एटीएफच्या प्रमुखपदाचीही शपथ घेतली. अल्कोहोल, तंबाखू, फायर आर्म्स म्हणजेच अग्निशस्त्र आणि एक्स्प्लोसिव्ह म्हणजेच स्पह्टके या विभागाचेही ते प्रमुख असणार आहेत. अशाप्रकारे काश न्याय विभागाच्या दोन वेगवेगळय़ा खात्यांचे प्रमुख बनले आहेत.

एफबीआयचे संचालक बनल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्यावर एटीएफचीही जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी एटीएफच्या मुख्यालयात प्रमुख पदाची शपथ घेतली. या विभागातील तब्बल साडेपाच हजार कर्मचाऱ्यांची कमान आता काश पटेल यांच्या हातात असणार आहे. हा विभाग देशातील अग्निशस्त्र किंवा बंदुका, अल्कोहोल, तंबाखू आणि स्फोटके यांबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एटीएफच्या विभागावर असणार आहे.