संयुक्त किसान मोर्चा नेते जगजित सिंग डल्लेवाल यांच्या आमरण उपोषणाचा 43 वा दिवस आहे. असे असताना देखील केंद्राकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कोणतीही हालचाल नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकरी आंदोलकांनी आपला राग व्यक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या निषेधार्थ 26 जानेवारीला देशव्यापी ट्रॅक्टर मोर्चाची घोषणा केली आहे.
मंगळवारी शेतकरी आंदोलकांनी अनेक घोषणा केल्या. यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, 26 जानेवारी रोजी केंद्राचा निषेध म्हणून शेकडो ट्रॅक्टर रस्त्यावर येतील. 13 फेब्रुवारी 2024 पासून, संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्त्वाखाली, केंद्राने किमान आधारभूत किंमतीवर (MSP) कायदेशीर हमी द्यावी या मागणीसाठी खनौरी येथील पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत.
एमएसपी हमी व्यतिरिक्त, शेतकरी कर्जमाफी, पेन्शन, वीज दरात वाढ करू नका, पोलीस केस मागे घ्या आणि 2021 च्या लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय द्या. सुरक्षा दलांनी दिल्लीकडे जाणारा मोर्चा रोखल्यानंतर खनौरी सीमेवर शेतकरी तळ ठोकून आहेत.
प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मार्चपूर्वी, 13 जानेवारीला शेतकरी नवीन शेती धोरणाचे मसुदे गावोगावी जाळण्याची योजना देखील आखण्यात आली आहे.