परभणीत अजितदादांवर चुना फेक

एक रुपयात पीक विम्याच्या योजनेला शेतकऱ्यांनी लावला चुना असे वक्तव्य केल्याबद्दल परभणीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडय़ांच्या ताफ्यावर चुना फेकण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला.

अजित पवार हे परभणी जिह्याच्या दौऱ्यावर आहेत. परभणीमध्ये येताच त्यांनी नृसिंह पोखर्णी येथे दर्शन घेऊन परभणी शहरात दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून जात असताना भारतीय किसान सभा व युवक काँग्रेस आणि शेतकऱयांनी सरकारने चुना लावला आहे, अशा घोषणा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर लांबून ‘चुना फेको’ आंदोलनाचा प्रयत्न केला.