संयुक्त किसान मोर्चात सहभागी शेतकरी नेत्यांच्या अटकेमुळे पुन्हा एकदा गदारोळ होण्याची शक्यता आहे. भारतीय किसान युनियन टिकैतने (BKU) या मुद्द्यावर महापंचायत बोलावली आहे. ही महापंचायत बुधवारी ग्रेटर नोएडाच्या झिरो पॉइंटवर होणार आहे. राकेश टिकैत हे या महापंचायतीचे नेतृत्व करणार आहेत. या महापंचायतीत केवळ पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरीच नाही तर इतर राज्यातील शेतकरीही सहभागी होण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये शेतकऱ्यांनी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्याची मागणी करत पुन्हा एकदा आंदोलन केले आहे. दरम्यान, संयुक्त आघाडीच्या शेतकरी नेत्यांच्या अटकेबाबत शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यातच भारतीय किसान युनियन टिकैतने उद्या म्हणजेच बुधवारी महापंचायत आयोजित केली आहे. ग्रेटर नोएडा येथील झिरो पॉइंट येथे राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली ही महापंचायत आयोजित केली जाणार आहे. सिसोली पंचायतीचे चौधरी नरेश टिकैत यांनी लोकांना ट्रॅक्टरने नोएडा गाठण्याचे आवाहन केले आहे.