कांद्याच्या प्रश्नासंदर्भात शेतकरी आक्रमक; निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर महाविकास आघाडीचा मोर्चा

शेतकऱ्यांच्या दुधाचा व कांद्याचा प्रश्न ज्वलंत असताना आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताधारी व प्रशासनाचा धिक्कार करत महाविकास आघाडीने शक्तीप्रदर्शन करत खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणाचा निषेध केला. मी शेतकरी असे म्हणत आलेल्या आंदोलनकर्त्यांनी डोक्यावर पांढऱ्या टोप्या परिधान केल्या होत्या. पांडुरंगाचे भजन म्हणत हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय पोलिसांनी हा मोर्चा अडवला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटच्या समोर गाई म्हशी या बांधण्यात आलेल्या होत्या. यावेळी राज्य सरकारच्या विरोधामध्ये जोरदारपणे घोषणाबाजी करण्यात आली या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय असे म्हणत हा परिसर दणाणून सोडला होता.

कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन होऊ नये असा प्रशासनाचा प्रयत्न होता विशेष म्हणजे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर थेट दिल्ली येथे केंद्रीय मंत्री आणि शहा यांची भेट घेत दुधाच्या प्रश्नावर लक्ष घालावे अशी त्यांनी मागणी केली. म्हणजेच याचा अर्थ खासदार निरस लंके यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर विखे यांना जाग आली अशी चर्चा सुरू होती.

खासदार निलेश लंके यांनी शेतकऱ्यांच्या दुधाच्या व कांद्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी जे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता केली. जोपर्यंत शेतकऱ्यांना आण त्यांच्या कष्टाला भाव मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही असे सांगितले होते. दुधाच्या व कांद्याच्या प्रशासन संदर्भामध्ये आपण आंदोलन करू, असे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले. जुन्या महानगरपालिकेपासून या आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनामध्ये गाई व म्हशी या आणण्यात आलेल्या होत्या या जनावरांच्यावर महाविकास आघाडी तसेच दुधाला भाव द्या कांद्याला भाव द्या असे लिहिलेले होते. विशेष म्हणजे या आंदोलनांमध्ये सहकार सहभागी झालेले सर्व आंदोलन करते यांनी पांढरी टोपी परिधान करत मी शेतकरी असा उल्लेख केलेला होता.

जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले की, दुधाचा व कांद्याचा प्रश्न हा आपण प्रामुख्याने हातात घेणार असे आश्वासन खासदार लंकेने दिले होते. त्यानुसार आजचा हा मोर्चा काढला होता. या मोर्चाला अडवण्याचा प्रयत्न झाला. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, अशी भूमिका महाविकास आघाडीची आहे. त्यासाठीच आपण या ठिकाणी आलेलो आहोत. दुधाला व कांद्याला भाव मिळाला नाही तर त्यांचा स्वस्त बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.