कोबीचा भाव अवघा 30 पैसे; शेतकऱ्याने पिकावर फिरवला रोटावेटर

ढगाळ वातावरण, अवकाळीच्या तडाख्यातून कसेबसे पीक वाचवले. मात्र त्याला मिळणाऱ्या भावातून उत्पादन खर्च दूरच, साधा वाहतूक खर्चही सुटणार नाही, यामुळे उद्विग्न होऊन शेळके यांनी पीकच उद्ध्वस्त केले. सध्या बाजारात आवक वाढल्याने कोबीला अवघा 30 ते 80 पैसे किलो भाव मिळत आहे व यातून साधा वाहतुकीचा खर्चही भागत नाही. सगळीच मेहनत वाया गेल्याने उत्पादक मोठय़ा आर्थिक संकटात सापडले आहेत. सिन्नरच्या विंचूर दळवीत याच परिस्थितीला सामोरे गेलेल्या उत्पादकाने रोटावेटर फिरवून पीक उद्ध्वस्त करीत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.