शेतकरी नेते डल्लेवाल बेशुद्ध; प्रकृती चिंताजनक

खनौरी सीमेवर मागील 42 दिवसांपासून आमरण उपोषण करत असलेले शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल सोमवारी रात्री प्रकृती बिघडल्याने अचानक बेशुद्ध पडले. जवळपास एक तास ते बेशुद्ध होते. डॉक्टरांच्या टीमने त्यांच्या हात आणि पायाची मसाज केल्यानंतर त्यांना शुद्ध आली. 4 जानेवारीला महापंचायतीत 70 वर्षीय डल्लेवाल यांनी 9 मिनिटांचे भाषण केले होते. त्यानंतर दिवसेंदिवस त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली. चक्कर आल्याने उलटय़ा झाल्या. रक्तदाब कमी झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पंजाबमधील शेतकरी नेत्यांनी पेंद्र सरकारला इशारा देताना जगजीत सिंग डल्लेवाल यांना काही झाल्यास परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर जाईल असे म्हटले. पेंद्राने लवकरात लवकर शेतकऱयांची समस्या सोडवावी.