विधान परिषदेतील पाच निवृत्त सदस्यांचा आज निरोप समारंभ

महाराष्ट्र विधान परिषदेतील 21 जून 2024 रोजी पाच सदस्य निवृत्त झाले आहेत. निवृत्त झालेल्या सदस्यांचा निरोप समारंभ 27 जून रोजी दुपारी 3.00 वाजता विधिमंडळ मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

विधान परिषद सदस्य सुरेश धस, प्रवीण पोटे – पाटील, रामदास आंबटकर, नरेंद्र दराडे, विप्लव बाजोरिया हे 21 जून रोजी निवृत्त झाले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.