लग्नानंतर सुरुवीताचे 6 महिने मी त्याला ‘गे’ समजायची, तिरस्कार करायची; बॉलिवूड अभिनेत्रीनं सांगितली अंदर की बात

फराह खान हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव असून तिने अनेक उत्तमोत्तम गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. यासह शाहरूख खान आणि दापिका पदुकोणची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘ओम शांती ओम’ व ‘मै हू ना’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. यासह अनेक शोमध्ये ती जज म्हणूनही दिसली आहे. फराह कायम प्रसिद्धीझोतात असते तर तिचा पती शिरीष कुंदर मात्र या झगमगाटापासून दूर असतो. या जोडप्याच्या लग्नाला नुकतेच (9 डिसेंबर) 20 वर्ष पूर्ण झाले. आता लग्नानंतर एवढ्या वर्षांनी तिने खासगी आयुष्यातील ‘अंदर की बात’ उघड केली आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर, निर्माती, दिग्दर्शक आणि अभिनयातही हात आजमावल्या फराह खान हिने अर्चन पूरण सिंगला दिलेल्या मुलाखतीत खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. पती शिरीष कुंदर याला लग्नानंतर सहा महिन्यापर्यंत मी गे समजत होते आणि त्याचा खुप तिरस्कारही करत होते असे तिने सांगितले. यादरम्यान फराह हिने तिची लव्हस्टोरीही सांगितली.

लग्नानंतर सुरुवातीचे सहा महिने मी शिरीषला गे समजत होती, असे फराह खान म्हणते. आता त्याच्याबाबतच्या फिलिंग्स बदलल्या आहेत का? असे विचारले असता ती विनोदी अंदाजात म्हणाली की, आधी त्याला खूप राग यायचा. त्याला राग येतो तेव्हा खूप कठीण होते. कारण तो फक्त गप्प राहतो आणि न बोलताच टॉर्चर करतो.

भांडणानंतर कोण सॉरी म्हणते? असे विचारले असता फराह म्हणते की, कुणीही एकमेकांना सॉरी म्हणत नाही. शिरीषने गेल्या 20 वर्षात कधीच माझी माफी मागितली नाही. कारण तो कधीच चुकीचा नसतो. जर तो बोलत असेल आणि माझे लक्ष फोनमध्ये असेल तर तो तसाच बाहेर निघून जातो, असेही ती म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder)

लग्नाला 20 वर्ष पूर्ण

फराह खान आणि शिरीष कुंदर 9 डिसेंबर 2004 रोजी विवाहबंधनात अडकले. गेल्या वर्षी त्यांच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झाले. ‘मै हू ना’ चित्रपटादरम्यान दोघांची पहिली भेट झाली होती. या दाम्पत्याला दिवा आणि अन्या या दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्याचे नाव जार असे आहे.