ऋतिकसाठी चाहत्याने खर्च केले 1.2 लाख रुपये

बॉलीवूड अभिनेता ऋतिक सध्या कार्यक्रमासाठी अमेरिकेत आहे. ऋतिकला भेटण्यासाठी आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी एका चाहत्याने तब्बल 1.2 लाख रुपये मोजले, परंतु त्याला ना फोटो मिळाला ना ऋतिक रोशनची भेट झाली. या चाहत्याने इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी 1 लाख 28 हजार रुपये मोजले, परंतु टेक्सासमध्ये थंडी असूनही दोन तास रांगेत उभे राहावे लागले. पैसे खर्च केल्यानंतर ऋतिक रोशनला जवळून पाहता आले नाही, असे त्याने म्हटले आहे.