![abhinav](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/abhinav-696x447.jpg)
प्रसिद्ध रॅपर अभिनव सिंग उर्फ जगरनॉट (32) याने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले आहे. तो बंगळुरुच्या कडुबीनहल्ली परिसरात एका अपार्टमेण्टमध्ये भाड्याने राहत होता तिथेच त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी रॅपरच्या मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सुरुवातीच्या तपासात पोलिसांनी रॅपरच्या मृत्यूला आत्महत्या म्हटले आहे.
जगरनॉटच्या आईच्या म्हणण्यांनुसार, तो मानसिक तणावाखाली होता. त्याच्या पत्नीशी बराच काळ त्याचा वाद सुरू होता, तिने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते ज्यामुळे अभिनव त्रस्त होता. त्यामुळे अभिनवने विषारी औषध घेऊन जीवन संपवल्याचा त्याच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे. शवविच्छेदनानंतर, मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ओडिशाला पाठवण्यात आला आहे. अभिनवच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये 8 ते 10 लोकांची नावे देण्यात आली आहेत. रॅपरच्या वडिलांनी आरोप केला आहे की, आपल्या मुलावर त्याची पत्नी आणि इतर काही लोकांकडून गंभीर आरोप होत होते. ज्यामुळे तो अस्वस्थ होता आणि मानसिक तणावाखाली होता. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
अभिनव मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध रॅपर होता. ‘कटक अँथम’ गाऊन तो प्रसिद्धीच्या झोतात आला. पण त्याचे वैयक्तिक आयुष्य चांगले चालले नव्हते. त्याच्या पत्नीने त्याच्यावर मारहाणीसारखे अनेक गंभीर आरोप केले होते.