प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. बेनेगल हे दीर्घ काळापासून आजारी होते. बेनेगल यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. श्याम बेनेगल यांनी नुकताच 14 डिसेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा केला.
श्याम बेनेगल यांनी 1974 मध्ये ‘अंकुर’ सिनेमातून आपल्या दिग्दर्शनाला सुरवात केली. या चित्रपटामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. यााशिवाय त्यांनी ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘सरदारी बेगम’, ‘जुबैदा’ आदि चित्रपटांचे दिर्गदर्शन केले आहे.
दिग्दर्शनातील भरीव कामगिरीबद्दल श्याम बेनेगल यांना सरकारने 1976 मध्ये पद्मश्री आणि 1991 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला ‘मंथन’ हा चाहत्यांच्या आर्थिक सहकार्याने बनलेला पहिला चित्रपट होता.