आयआयटीयन बाबा अशी ओळख असलेल्या आणि मुंबई आयआयटीतून एअरोस्पेस इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या अभय सिंह यांची आता कुटुंबालासुद्धा ओढ लागली आहे. संपूर्ण कुटुंबाला वाटते की, मुलाने परत घरी यावे, अशी अपेक्षा अभय सिंह यांच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. अभय सिंह यांच्या वडिलांचे नाव करण ग्रेवाल असे असून ते हरयाणातील झज्जर न्यायालयात कामाला आहेत. त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना ही अपेक्षा बोलून दाखवली. माझा मुलगा अध्यात्माचा संदेश जगभर पोहोचवण्यासाङ्गी साधू बनला आहे. महापुंभमध्ये मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अभय सिंह यांच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुलगा साधू बाबा बनल्यानंतर घरी परत येणे शक्य वाटत नाही, परंतु संपूर्ण कुटुंबाची तशी अपेक्षा आहे की, त्याने पुन्हा घरी यावे, असे वडील म्हणाले.
टॉप कंपन्यांत नोकरी
अभय सिंह यांनी मुंबई आयआयटीमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर मास्टर्स ऑफ डिझायनिंग कोर्ससुद्धा केला आहे. मुलाने दिल्ली, कॅनडामधील प्रतिष्ठत पंपन्यांमध्ये नोकरी केली आहे. कॅनडा सोडल्यानंतर पुन्हा हिंदुस्थानात आल्यानंतर अभय सिंह मनाली, शिमला, हरिद्वारसह अनेक ठिकाणी फिरत असायचा. त्यातून त्याला भक्तीची ओढ लागली. त्यामुळे त्याने साधू बाबा बनण्याचा निर्णय घेतला. मुलासोबत सहा महिन्यांपूर्वी बातचीत झाली होती, असेही अभय सिंहच्या वडिलांनी सांगितले.