
पहलगाम हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचे रक्त उसळले असून हल्ल्याला बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये दिले.
दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात देशातील 140 कोटी नागरिकांची एकता हीच सर्वात मोठी ताकद आहे. ही एकता दहशतवादाविरुद्धच्या आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे, असे ते म्हणाले. येथील शाळा-महाविद्यालये गजबजली आहेत. विकासकामांना वेग आला आहे. इथली लोकशाही मजबूत होते आहे. पर्यटकांची संख्या विक्रमी वेगाने वाढली आहे. लोकांना रोजगार मिळतो आहे. तरुणांकरिता नवीन संधी निर्माण होत आहेत. अशात पर्यटकांवरील हल्ला हा दहशतवाद्यांची हताश आणि भ्याड वृत्ती दाखवून देतो, असे त्यांनी म्हटले. देशाच्या, जम्मू आणि काश्मीरच्या शत्रूंना हे बघवत नाही. दहशतवादी आणि त्यांचे सूत्रधार कश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करू इच्छितात. म्हणूनच त्यांनी इतका मोठा कट रचला, असा आरोप मोदींनी केला.
दहशतवादाविरोधात संपूर्ण जग भारतीयांसोबत
देशाच्या, जम्मू आणि काश्मीरच्या शत्रूंना हे बघवत नाही. दहशतवादी आणि त्यांचे सूत्रधार कश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करू इच्छितात. म्हणूनच त्यांनी इतका मोठा कट रचला, असा आरोप मोदींनी केला. या हल्ल्याचा संपूर्ण जगाकडून निषेध केला जात आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण जग 140 कोटी भारतीयांसोबत उभे आहे, असा विश्वास त्यांनी दिला.