ट्रायचे अधिकारी असल्याची बतावणी करून महिलेच्या नावाने बनावट अटक वॉरंटची धमकी देऊन पॉर्न व्हिडीओ खरेदी करण्याच्या केसमध्ये तिला डिजिटली अटक केली आणि नंतर तिच्या खात्यातून सुमारे 60 लाख रुपये उडवले. याप्रकरणी पीडित महिलेने नोएडा सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार केली असून तपास सुरू आहे. सेक्टर 77 येथे राहणारी 40 वर्षीय डॉ. पूजा गोयलने पोलिसांना सांगितले की, 13 जुलै रोजी मला एक कॉल आला. कॉल करणाऱया व्यक्तीने आपण ट्रायचा अधिकारी असल्याचे सांगितले. माझ्या एका पह्न नंबरवरून अश्लील व्हिडीओ खरेदी केला गेला असल्याचे सांगितले. जर पैसे दिले नाही तर तुमच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले जाईल, अशी धमकी दिली. डॉ. पूजाच्या तक्रारीनंतर नोएडा सेक्टर 36 येथील सायबर गुन्हे शाखेत एफआयआर दाखल झाला आहे.