शाहू महाराजांच्या विशाळगडावरील ‘त्या’ फोटोचं सत्य समोर आलं; खोटा नॅरेटिव्ह सेट करणारे तोंडावर आपटले

ऐतिहासिक विशाळगड आणि परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत रविवारी समाजकंटकांच्या पूर्वनियोजित हल्ल्यात नुकसान झालेल्या गजापूर-मुसलमानवाडी या गावाला खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी भेट देऊन त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावातील घरेदारे उद्ध्वस्त होऊन संसार उघड्यावर पडलेल्या महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या.

या भेटीदरम्यानचा शाहू महाराज यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता त्या फोटोमागील सत्य समोर आले असून खोटा नॅरेटिव्ह सेट करणारे तोंडावर आपटले आहेत.

गजापूर-मुसलमानवाडीला भेट दिल्यानंतर शाहू महाराज छत्रपती यांनी येथील मुसलमानांची कान धरून माफी मागितली असा आशय असणारा फोटो सोशल मीडियावर शेअर करून खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता या फोटोमागील सत्य समोर आले आहे. शाहू महाराज छत्रपती यांनी गजापूर-मुसलमानवाडीला भेट दिली तेव्हा महिलांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या होत्या.

विशाळगडाबाबतच्या आक्षेपार्ह पोस्टवर बंदी; कलम 163 जारी, कोल्हापूर जिह्यात उद्यापर्यंत अंमलबजावणी

यावेळी एका महिलेने माझ्या कानातील दागिने ओढून नेले, कान पकडायला लावले असे शाहू महाराज छत्रपती यांना सांगितले. हीच बाब शाहू महाराज छत्रपती आमदार सतेज पाटिल यांना सांगतात. याचा स्पष्ट व्हिडीओही समोर आला आहे. त्यामुळे याच व्हिडीओतील स्क्रिनशॉट वापरून शाहू महाराज छत्रपती यांच्याबाबत खोटा नॅरेटिव्ह सेट करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणारे मात्र चांगलेच तोंडावर आपटले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)