Facial- उन्हाळ्यात काकडीचे आईस फेशियल कसे कराल? वाचा आईस फेशियलचे खूप सारे फायदे

उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी घेणे सर्वात महत्वाचे असते. उन्हामुळे आणि प्रदुषणामुळे त्वचेची अक्षरशः वाट लागते. त्यामुळेच चेहऱ्यावर उन्हाळ्यात पुरळ आणि लालसरपणा यायला सुरुवात होते. परंतु उन्हाळ्यात आपण चेहऱ्यावर बर्फ लावल्यास मात्रव पुरळ येण्याचे प्रमाण कमी होते. उन्हाळ्यात आपण बर्फ वापरुन चेहऱ्याची निगा कशी राखु शकतो हे आपण पाहायला हवे. टॅनिंग झालेल्या त्वचेवर आपण बर्फाचे फेशियल कसे करु शकतो हे आपण बघुया.

 

काकडीचे आईस फेशियल
काकडीच्या रसानेही आईस फेशियल करता येऊ शकते. याकरता एका भांड्यात काकडीचा रस काढून घ्यावा. त्यानंतर हा रस एका बर्फाच्या ट्रेमध्ये ओता. हा रस फ्रीजमध्ये गोठवण्यासाठी ठेवा. व्यवस्थित गोठले की काकडीचा आईस बाहेर काढा आणि कापडाच्या मदतीने चेहऱ्यावर हळुवार फिरवावा. गोलाकार पद्धतीने हा आईस चेहऱ्यावर फिरवुन घ्यावा. यामुळे चेहऱ्यावरील लालसरपणा कमी होईल. शिवाय चेहरा हायड्रेटेड देखील राहील.

गुलाब पाण्याचे आईस फेशियल
गुलाबपाण्याच्या बर्फाने चेहऱ्यावर मसाज केल्यास, चेहऱ्याला अनोखा तजेला येतो. याकरता पाण्यात गुलाबजल मिसळून ते बर्फाच्या ट्रेमध्ये ओतावे लागेल. ते सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर ते तुमच्या चेहऱ्यावर लावा. हे लावल्याने पूर्वी असलेला लालसरपणा कमी होईल. तसेच, उष्णतेचा तुमच्या चेहऱ्यावर कमी परिणाम होईल. तुम्ही हे तुमच्या चेहऱ्यावर दररोज देखील लावू शकता. यामुळे चेहऱ्याचे हायड्रेशन टिकून राहील.

बर्फ लावताना या गोष्टी लक्षात ठेवा

बर्फ थेट त्वचेवर लावू नये. यामुळे तुमची त्वचा जळू शकते.

 

एका वेळी 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ आइस फेशियल करू नका. यामुळे त्वचेवर लालसरपणा येऊ शकतो.

 

बर्फाने फेशियल करण्यापूर्वी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या.

 

टीप: चेहऱ्यावर काहीही लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. तसेच, तज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)