
त्वचेची निगा राखण्यासाठी बाजारात अनेक महागडे उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु नैसर्गिक गोष्टींची तुलना होऊच शकत नाही. विशेषतः नारळाच्या तेलाचा विचार केला जातो तेव्हा ते आपल्या घरात वर्षानुवर्षांपासून वापरले जात आहे. नारळाच्या तेलात अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म भरपूर असतात जे त्वचेला पोषण देतात आणि त्वचा चमकदार देखील बनवतात. तुम्ही खोबरेल तेलात काही घरगुती आणि प्रभावी पदार्थ मिसळून वापरले तर, त्याचा परिणाम आणखी आश्चर्यकारक होतो. चला जाणून घेऊया अशा 5 गोष्टींबद्दल, ज्या नारळाच्या तेलात मिसळून लावल्यास त्वचेला जबरदस्त चमक मिळू शकते.
हळद आणि नारळ तेल
हळदीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. नारळाच्या तेलात हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्यास हे मिश्रण त्वचा खोलवर स्वच्छ करते आणि डाग कमी करण्यासाठी मदत करते. हे मिश्रण तयार करण्यासाठी एक चमचा नारळाच्या तेलात चिमूटभर हळद मिसळा आणि चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावा. नंतर कोमट पाण्याने धुवून टाका.
मध आणि नारळ तेल
मध हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. ते त्वचेला ओलावा देते आणि ती मऊ करते. नारळ तेल आणि मध समान प्रमाणात मिसळून चेहऱ्यावर लावल्याने मृत त्वचा निघून जाते. 15 मिनिटे लावल्यानंतर, कोमट पाण्याने धुवून टाका.
लिंबाचा रस आणि नारळ तेल
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि ब्लीचिंग गुणधर्म असतात, जे त्वचेचा रंग उजळवतात. जर तुमची त्वचा तेलकट असेल आणि त्यावर टॅनिंग किंवा पिग्मेंटेशन असेल तर नारळाचे तेल लिंबाच्या रसात मिसळून लावणे फायदेशीर ठरू शकते. लक्षात ठेवा की लिंबाचा रस आम्लयुक्त असतो, म्हणून तो आठवड्यातून फक्त 1-2 वेळा लावा आणि लावण्यापूर्वी चेहऱ्याची पॅच टेस्ट करा.
चंदन पावडर आणि नारळ तेल
चंदन पावडर त्वचेला थंडावा देण्यासाठी आणि डाग दूर करण्यासाठी ओळखली जाते. म्हणून नारळाच्या तेलात एक चमचा चंदन पावडर मिसळा आणि पेस्टप्रमाणे चेहऱ्यावर लावा. ते 15-20 मिनिटे तसेच राहू द्या आणि सुकल्यानंतर धुवून टाका. या मिश्रणाच्या नियमित वापराने त्वचा उजळते.
एलोवेरा जेल आणि नारळ तेल
नारळाच्या तेलात एलोवेरा जेल समान प्रमाणात मिसळून त्वचेवर लावल्याने चेहरा खोलवर मॉइश्चरायझ होतो. ज्यामुळे चेहरा चमकदार आणि ताजा दिसतो. कोरड्या आणि संवेदनशील त्वचेसाठी हे खूप फायदेशीर मानले जाते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)