‘लाडकी बहीण’साठी सप्टेंबरमध्येही नावनोंदणीची मुभा, आदिती तटकरे यांची माहिती

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना नावनोंदणी करता आली नाही. त्यामुळे महिला या योजनेपासून वंचित राहिल्या आहेत. पण आता सप्टेंबर महिन्यातही महिलांना या योजनेसाठी नावनोंदणी करता येणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून दिली आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत होती. हे अर्ज भरण्यासाठी महिलांची झुंबड उडाली. पात्र महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. पण गर्दी आणि काही तांत्रिक कारणांमुळे काही महिलांना ऑगस्ट अखेरपर्यंत अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे अनेक महिला या योजनेपासून वंचित राहिल्या. त्यामुळे नावनोंदणीसाठी आता या योजनेचा कालावधी वाढवला आहे.