शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षविरोधी कारवाई करणाऱया काही पदाधिकाऱयांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या पदाधिकाऱयांमध्ये हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे, हिंगोली जिह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील अजित मगर, रायगड जिह्यातील पनवेल विधानसभा मतदारसंघातील विश्वास जगन्नाथ पेठकर (पनवेल ग्रामीण तालुकाप्रमुख), एकनाथ दत्तू म्हात्रे (पनवेल महानगरप्रमुख) तसेच मुंबईतील मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील सहसमन्वयक हरीश धारिया यांचा समावेश आहे.