
देशातील निर्यातदार क्रेडिटवर माल निर्यात करतात, पण काही वेळा त्यांना परदेशातील ग्राहकांकडून पैसे दिले जात नाहीत. अशा वेळी निर्यातदारांचे पैसे बुडू नयेत आणि नुकसान टाळण्यासाठी निर्यातदारांनी ईसीजीसी विम्याचे संरक्षण घ्यावे, असे आवाहन ईसीजीसीचे कार्यकारी संचालक सुबीर दास यांनी केले.
महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने एनएसईमध्ये आयोजित परिषदेत दास यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जागतिक हवामान बदलामुळे सर्व प्रकारचे फलोत्पादन कमी होऊन ते 50 टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहोत. यावेळी एनएनईचे मुख्य अर्थतज्ञ तीर्थकार पटनाईक, मुंबई मेट्रो महाव्यवस्थापक असित रंजन, बँक ऑफ इंडियाच्या उपमहाव्यवस्थापक पी. टी. एस. एन. सरमा, युनियन बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक जुना रोझलीन, आशीर्वाद पाईप्सचे हरेंद्र बिस्ट, युनियन बँक ऑफ इंडियाचे निलेश कलोरे, एनएसआयसीचे महेंद्र मालविया, सनटेक एनर्जी सिस्टिमचे राजेश पाठक, एसबीआयचे दुर्योधन साहू उपस्थित होते.