बिकानेरमध्ये 2 जवानांचा स्फोटात मृत्यू

राजस्थानातील बिकानेर येथील महाजन फील्ड फायरिंग रेंजच्या नॉर्थ कॅम्पमध्ये सराव करताना झालेल्या स्फोटात दोन जवानांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याला सुरतगड येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये चार दिवसातील हा दुसरा अपघात आहे. दोन्ही अपघातात तीन जवान शहीद झाले आहेत. फायरिंग रेंजच्या चार्ली सेंटरमध्ये हा अपघात झाला. येथे लष्करी सराव सुरू होता. सकाळी तोफ डागताना अचानक स्फोट झाला, अशी माहिती लष्कराचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी दिली.